Connect with us

मराठी कलाकार

‘नटसम्राट’चा पोस्टर आऊट. पुन्हा एकदा रंगमंच गाजवायला तयार.

News

‘नटसम्राट’चा पोस्टर आऊट. पुन्हा एकदा रंगमंच गाजवायला तयार.

मराठी रंगभूमीवरील अजरामर कलाकृती ‘नटसम्राट’ पुन्हा एकदा नव्या ढंगात रंगभूमीवर येतंय. पुन्हा एकदा आपल्याला रंगमंचावर “कुणी घर देता का घर?” ऐकावयास मिळणार आहे. शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलेले हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. 4 नोव्हेंबरपासून “नटसम्राट” रंगमंचावर येणार असून नुकतंच या नाटकाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

रोहिणी हट्टंगडी, सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता मेंहदळे, अभिजीत झुंझारराव यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका असतील. “नटसम्राट” मधील गणपतराव म्हणजेच आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तीरेखा रसिकांना भावली होती. ही व्यक्तिरेखा नाना पाटेकर यांनी साकारली होती. आता ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार आहेत. मोहन जोशीसुद्धा या भूमिकेला न्याय देतील असा विश्वास रंगकर्मी आणि नाट्यरसिकांना आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या नाटक पाहण्यासाठी आतुर असतील यात काही शंका नाही.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top