Connect with us

मराठी कलाकार

“दादा कोंडके”हे माझे आवडते कलाकार-नवाजुद्दीन.अनुभवा त्याचा वोचमेन ते ऍक्टर प्रवास.

Featured

“दादा कोंडके”हे माझे आवडते कलाकार-नवाजुद्दीन.अनुभवा त्याचा वोचमेन ते ऍक्टर प्रवास.

‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टीमने कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये हजेरी लावली. चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी सर्वत्र प्रसिध्द होत आहे. याचनिमित्ताने या चित्रपटाची टीम म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्रकार, संजय राऊत कार्यक्रमामध्ये आले आहेत. मकरंद अनासपुरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या दोघांनी एकदम बेधडक आणि खुशखुशीत पद्धतीने दिली.

दरम्यान कारकिर्दीतील बऱ्याच आठवणी नवाजुद्दीनने सांगितल्या. मनोरंजन क्षेत्रामध्ये तब्बल 12 वर्षे स्ट्रगल केलं त्यावेळेस “आता सगळं संपल” असा विचार कधी मनामध्ये येऊन गेला का? असे विचारताच त्याने नक्कीच असा विचार मनामध्ये येऊन गेला असे म्हंटले आणि पुढे या क्षेत्रामधील वाटचालीबद्दल देखील सांगितले. तसेच कुठला फजितीचा किस्सा आठवतो का ? असे विचारताच नवाजुद्दीन म्हणाला एकदा मला फिल्मालय मध्ये बोलावले होते आणि मी चुकून फिल्मसिटी जाऊन पोहचलो हे मला अजून आठवत. वोचमॅन ते ऍक्टर या प्रवासामध्ये काय फरक पडला असे विचारले तेंव्हा त्याने जे उत्तर दिले ते तुम्हाला कार्यक्रमाच्या भागामध्ये बघायला मिळेलच. तसेच “दादा कोंडके” हे माझे आवडते कलाकार असे देखील तो म्हणाला आणि याच्याविषयीच्या आठवणी देखील सांगितल्या.

पहिल्यांदा जेंव्हा शिवसेनेतून फोन आला तेंव्हा काय वाटले? या महत्वाच्या प्रश्नाचेही उत्तर नवाजुद्दीने काय दिले हे प्रेक्षकांना “अस्सल पाहुणे इरसाल नमुने”च्या भागातूनच कळणार आहे.

Comments

More in Featured

To Top