Connect with us

मराठी कलाकार

घरातील व्यक्तींना भेटण्याची संधी देतायंत बिगबॉस! सदस्यांना झाले रडू अनावर.

बिग बॉस मराठी

घरातील व्यक्तींना भेटण्याची संधी देतायंत बिगबॉस! सदस्यांना झाले रडू अनावर.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य रंगलं होतं. अभिजीत आणि आरोहमध्ये हे कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. या टास्क मध्ये कोणता ग्रुप शक्ति पेक्षा युक्ति वापरुन हा टास्क त्यांच्या उमेदवारासाठी जिंकेल. ज्यामध्ये बिग बॉस यांनी कार्यासंबंधातले काही नियम आखून दिले आहेत. ज्यांचे उल्लंघन टास्क दरम्यान कोणीच करू शकत नाही. बिग बॉसचे नियम सगळ्या सदस्याना पाळणे बंधनकारक असते. पण शिव आणि विणाकडून महत्वाच्या नियमाचे उल्लंघन या कार्यादरम्यान होणार आहे.

बिग बॉस सगळ्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्या दरम्यान दिलेल्या सामुग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे. पण, कार्या दरम्यान शिव आणि विणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळे शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खडया व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूल मध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत.

तर दुसरीकडे घरातील सदस्यांचा आज ६६ वा दिवस. इतके दिवस आपल्या माणसांपासून दूर रहाणे अवघडच. आणि जेव्हा इतक्या दिवसांनी आपला माणूस आपल्याला भेटतो तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण होऊन बसते. असेच काहीसे आज घरातील सदस्यांबाबत होणार आहे. बिग बॉस सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देणार आहेत वा त्यांची इच्छा पूर्ण करणार आहेत असे म्हणायला हरकत नाही. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहाला नचिकेत भेटायला येणार आहे. त्याला इतक्या दिवसांनंतर समोर बघून नेहाला अश्रु अनावर झाले.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top