Connect with us

नेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात

Neha Pendse Pole Dance

Gossips

नेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात

छोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही. कितीसाऱ्या अभिनेत्री त्यांची ऑनस्क्रीन ईमेज मागे टाकत सोशल मीडियावर बोल्ड अंदाजात दिसतात. आता हेच बघा ना नुकतंच नेहा पेंडसेने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा पोल डान्स करतानाचा व्हीडिओ अपलोड केला आहे. या व्हीडिओमध्ये नेहा आपल्याला एका इंग्लिश गाण्यावर पोल डान्स करतांना दिसते आहे. तीने या व्हीडिओमध्ये खूप पारंगत असल्यागत डान्स केलेला आहे. आणि ती सध्या एकदम फिट असल्याचं वाटत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते कि ‘खूप मोठ्या ब्रेक नंतर माझ्या जुन्या प्रेमाकडे वापस वळते आहे’. तुमच्या माहितीसाठी याआधीही नेहाने एकदा इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला होता.

https://www.instagram.com/p/BaMAxNyBg1j/

नेहा हि लाईफ ओके वरील कॉमेडी शो ‘मे आय कम इन मॅडम’ मध्ये संजना नावाच्या बॉसची भुमिका साकारते आहे. संजनाच्याच रोल मुळे ती घराघरांत जाऊन पोचली. आता मालिकेनंतर रिअल लाईफ मध्ये सुद्धा नेहा ह्या अदा दाखवून सगळ्यांना घायाळ करते आहे. सेलिब्रिटीज सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि ती पोस्ट व्हायरल नाही झाली तर नवलंच! तसंच नेहाने हा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच लाखो लाईक्स ह्या व्हीडिओला मिळाल्या. नेहा पेंडसेने ‘हसरते’ या टीव्ही शो मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. शिवाय तिने भाग्यलक्ष्मी, मिठी मिठी बातें सारख्या मालिकांमध्ये पण काम केलं आहे. नेहा आपल्याला मराठी, हिंदी, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतसुद्धा दिसली आहे.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Gossips

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top