Connect with us

मराठी कलाकार

“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.

Television

“हे”रंजक वळण येणार “घाडगे&सून”मालिकेत.केला ५०० भागांचा पल्ला पूर्ण.

“घाडगे & सून” ही कलर्स मराठीवरील मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बघता बघता मालिकेने तब्बल ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. ५०० भागांनंतर मालिका आणखी रंजक वळण घेणार आहे. याचबरोबर आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच अचंबित करणाऱ्या घटनाही बघायला मिळणार आहेत.

अभिनेता चिन्मय उदगीरकर यावेळी बोलतांना म्हणाला कि, “घाडगे & सून मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले यावर खरोखरच विश्वास बसत नाहीये… असं वाटत आहे काल परवाच शूट सुरु झालं. अक्षय ही भूमिका करताना मला खूप समाधान मिळत आहे. कारण मी आजवर ज्या भूमिका साकारल्या त्या सगळ्यांपेक्षा वेगवेगळ्या छटा या भूमिकेला आहेत, आणि खूप आव्हानात्मक आहे. मी जेंव्हा काही कार्यक्रमांना जातो तेंव्हा मला प्रेक्षक अकी म्हणून हाक मारतात इतकी ही भूमिका त्यांना आपलीशी वाटते आणि आवडते याचा मला आनंद आहे. मला या मालिकेच्या रुपाने एक दुसरं कुटुंबच मिळालं आहे.”

घाडगे सदनामधून परत जाताना अक्कांनी अक्षयला एक मोठं सत्य सांगितले ज्यामुळे आता लवकरच अक्षय आणि कियाराच आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. कियारा गरोदर नसल्याचं सत्य अक्षयला कळल्यामुळे तो पूर्णतः खचून गेला आहे. आता पुढे अक्षय कुठले पाउल उचलेल ? कियाराला अक्षय या गोष्टीचा जाब विचारू शकेल का ? अक्षय कियाराचे सत्य घरच्यांना सांगू शकेल ? कियारा घरात परतली आहे आता अमृताचं अस्तित्व घाडगे परिवारात काय असेल ? हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे. “घाडगे & सून”च्या येणाऱ्या भागांमधून हे सर्व आपल्याला कळू शकणार आहे.

Comments

More in Television

To Top