Connect with us

मराठी कलाकार

एक अनोख्या धाटणीची, स्त्रीप्रधान कथा ‘बोगदा’. पहा ट्रेलर.

Movie Teaser

एक अनोख्या धाटणीची, स्त्रीप्रधान कथा ‘बोगदा’. पहा ट्रेलर.

नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित, दिग्दर्शित ‘बोगदा’ सिनेमाचा नुकताच टीझर लाँच करण्यात आला असून सोशल मीडियावर सध्या या टीझरला खूपच चांगला प्रतिसाद मिळात आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी आणि मृण्मयी देशपांडे  या दोघांची बोगदा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. प्रस्तुत सिनेमा आई आणि मुली यांच्या नातेसंबधावर आधारित आहे. चित्रपटात मृण्मयी मुलीच्या तर सुहास जोशी आईच्या भूमिकेत आहेत. जगातल्या प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून, त्यांचे मतभेद आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची नाजूक गुंफण या सिनेमात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे’ असं या सिनेमाच्या दिग्दर्शिका निशिका केणी म्हणाल्या.

सकस आशय आणि सर्जन दिग्दर्शनाचा हातभार असल्याने बोगदा हा सिनेमादेखील एका वेगळ्याच धाटणीचा असल्याचे टिझरवरून स्पष्ट होते. अभिनेत्री सुहास जोशी आणि मृण्मयी देशपांडे ह्यांनी आधी कुंकू या मालिकेत काम केले असून त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती.  माय-लेकीचे  हळूवार नाते मांडतांना आपल्याला सिनेमाचा टिझर पाहायला मिळत आहे.’ स्त्रीप्रधान भूमिकेवर मराठीत कमी सिनेमे बनले आहेत. त्यामुळे बोगदा या सिनेमात मी स्त्रीव्यक्तिरेखाला अधिक महत्व दिले आहे’ असंही या सिनेमाच्या दिग्दर्शिका ह्यावेळी म्हणाल्या. येत्या ७ सप्टेंबर रोजी सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Comments

More in Movie Teaser

To Top