Connect with us

मराठी कलाकार

“आराराsss राss राss… खतरनाक!” गाणं सर्वत्र घालतंय धुमाकूळ. पहा व्हीडीओ.

Video Songs

“आराराsss राss राss… खतरनाक!” गाणं सर्वत्र घालतंय धुमाकूळ. पहा व्हीडीओ.

हल्ली ‘आराराsss राss राss… खतरनाक!’ हा महाराष्ट्रात सगळ्यांच्याच ओळखीचा शब्द परिचय बनला असून नुकतंच त्यावर आधारित गाणं सुद्धा बनलं आहे. सोशल मीडियावर तर सध्या ह्या गाण्याने चांगलाच धुमाकूळ माजवला आहे. आराराsss राss राss..म्हटलं कि लगेच प्रवीण तरडे यांची छबी आपल्या डोळ्यांसमोर येते. आणि प्रस्तुत गाण्यात ते स्वतः आपल्याला थिरकताना दिसत आहेत. सदर गाणं आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील असून, प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ऐन गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. त्यामुळे विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी हे गाणं तरुणाईला नक्कीच थिरकवेल, अशी आशा आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं असून गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे तर नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

Comments

More in Video Songs

To Top