Connect with us

अखेरीस ‘न्यूड’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

nude marathi movie poster

News

अखेरीस ‘न्यूड’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

nude marathi movie ravi jadhav

इफ्फी चित्रपट महोत्सवापासूनच चर्चेत असलेला रवी जाधव ह्यांचा ‘न्यूड’ अखेरीस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस सिनेमागृहांमध्ये येत आहे. सिनेमाच्या नावाहूनच सुरुवातीला वाद निर्माण झाला होता. बराच कालावधी निघून जाऊनही हा सिनेमा रिलीज न झाल्यामुळे ह्याबाबत अजून उत्सुकता ताणली गेली होती. शेवटी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून हा सिनेमा 27 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

nude marathi cinema poster launch

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये तसेच ऐस दुर्गा महोत्सवामधूनही ‘न्यूड‘ ला वगळण्यात आले होते. याविषयीची जाहीर नाराजीसुद्धा रवी जाधव ह्यांनी व्यक्त केली होती. मराठी कलाकारांनीही त्यांना त्यावेळी साथ दिली होती. इतकंच काय तर अभिनेत्री विद्या बालनने सुद्धा सिनेमाला स्टॅण्डिंग ओवेशन दिली होती. ह्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिले आहे. सिनेमाची कथा खुद्द रवी जाधव यांनीच लिहिली असून स्क्रीनप्ले हा गुलाबजाम फेम सचिन कुंडलकर ह्यांचा आहे. वादांना तोंड देत हा सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांना भेटायला येतोय!

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top