Connect with us

पहा ‘न्यूड’ सिनेमाचे टीजर

Nude Marathi Movie Teaser

Movie Teaser

पहा ‘न्यूड’ सिनेमाचे टीजर

रवी जाधव यांचा आगामी चित्रपट ‘न्यूड’ने मुंबई – गोवा येथे होणाऱ्या ४८ व्या (IFFI)आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार होते. परंतु चित्रपट निवड समितीचे सदस्य व माहिती व प्रसारण मंत्रालयाने शेवटच्या मिनिटाला बाहेरचा रस्ता दाखवला. ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज नुकताच करण्यात आला आहे. या मराठी चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरु आहे.

रवी जाधव यांनी झी स्टुडिओसह न्यूड या सिनेमाची सह-निर्मिती केली आहे. २०१८ च्या सुरुवातीला ही मूव्ही रिलीज करण्याची योजना आहे.या टीझरमध्ये अभिनेत्री कल्याणी मुळेचे गावाकडचे आयुष्य, तेथील नदी, तुळशी वृंदावन अतिशय सुंदररित्या दाखवले आहे. तसेत त्यानंतर मुंबईत आल्यावर जेजे महाविद्यालयापर्यंत ती कशी पोहोचते ते बघायला मिळते.

रवी जाधव यांनी फेसबुकवर हा टीझर पोस्ट करत त्यासोबत सध्या सुरू असलेल्या वादावर खालील पोस्ट लिहली आहे.

ज्या चित्रपटावरून एवढा वाद चाललाय त्या ‘न्यूड’ चित्रपटाचा हा टीजर. जो वाद होतोय तो खरंच अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. या चित्रपटात एका कलाकाराच्या कानाखाली मारली जाते जे दुर्दैवाने आता माझ्या बाबतीत खरं ठरतंय. तरीही सर्व कलाकारांसारखा मीही अजून आशावादी आहे. सर्व IFFI ज्युरी, मीडिया व चित्रकर्मी मित्रांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल शतशः आभार. मनापासून केलेला हा चित्रपट आहे.

तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ‘कासव’च्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी ‘इफ्फी’त हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top