Connect with us

मैत्रीच्या नात्यातील अव्यक्त भावना – ओढ । नवीन मराठी चित्रपट

Movie Trailers

मैत्रीच्या नात्यातील अव्यक्त भावना – ओढ । नवीन मराठी चित्रपट

जगातील सर्वात पवित्र व शुद्ध नातं म्हणजे मैत्री चं नातं. ती हि एक मुलगा आणि एका मुलीची मैत्री असेल तर गोष्टच न्यारी ! तर अशाच मैत्रीच्या हळुवार बंधनातील अव्यक्त भावना व्यक्त करणारा एक नवीन मराठी चित्रपट येतोय ओढ. या नवीन मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे यात भरपूर मोठी स्टारकास्ट.  मोहन जोशी, भारत गणेशपुरे, भालचंद्र उर्फ भाऊ कदम, मृणाल कुलकर्णी, शशिकांत केतकर, जयवंत भालेकर या  नामाचीन हस्तींसोबत उल्का गुप्ता आणि गणेश तोवर ही नवीन जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण  करतेय.

एक मुलगा (गणेश तोवर) आणि एक मुलगी (उल्का गुप्ता ) हे मैत्रीच्या नात्यात बांधले जातात.  मात्र किशोरवयात  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम ! मग हि मैत्री प्रेमाचं  रुप घेऊ शकेल का ? त्याला समाजाची मान्यता मिळेल कि नाही ? ओढ म्हणजे आकर्षण. ओढची कथा आपल्याला  किशोरवयीन मुलांच्या दृष्टीकोनतून प्रेम, मैत्रिणी आणि प्रेमळपणा यांची ओळख करून देते.  

उल्का गुप्ता या उदयोन्मुख अभिनेत्रीने याआधीही झाशीची राणी लक्ष्मीबाई या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या हिंदी मालिका “झाँसी की रानी” मध्ये  राणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणीची भूमिका केली आहे.  उल्का गुप्ता हिने यापूर्वी बॉलिवूड आणि टॉलिवूड मध्ये काम केलेले आहे.  तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि उल्काला हिंदी, तामिळ, तेलुगु , इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व प्राप्त आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने ती सध्या मराठी भाषासुद्धा  शिकत आहे.

Ulka Gupta

या चित्रपटाचे चित्रीकरण मराठवाड्यातील लातूर, तुळजापूर आणि ताकवीक या ठिकाणी झाले आहे. कथा, पटकथा दिग्दर्शक दिनेश ठाकूर यांनी लिहिली आहे, तर संवाद गणेश कदम यांनी लिहिलेले आहेत. अभय इनामदार, संजली रोड, कूकू प्रभास, कौस्तुभ आणि संगीत प्रविण कुवार यांनी गीते लिहिली आहेत. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर व्ही. एन. रेड्डी यांचे पुत्र रविकांत रेड्डी यांनी छायाचित्रण केले आहे. स्वप्निल बांदोडकर, डॉ. नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंद जोशी आणि जावेद अली यांनी गाणी गायली आहेत.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top