Connect with us

मराठी कलाकार

कोण आहे बिगबॉसच्या घरातील बेचव हिंग?परागची पुन्हा घरात वापसी.वाचा अधिक.

बिग बॉस मराठी

कोण आहे बिगबॉसच्या घरातील बेचव हिंग?परागची पुन्हा घरात वापसी.वाचा अधिक.

गेल्या काही दिवसांपासून कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी2’ सीझन २ प्रचंड चर्चेत आहे. वाद, चुगल्या, कुरघोडी हे बिग बॉसच्या घरासाठी नवे नाहीत. पण यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक गोष्ट बिग बॉसच्या घरात आहे. ते म्हणजे, मसाले. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. बिग बॉसच्या प्रतिस्पर्ध्यांना काही मसालेदार नावे मिळाली आहेत. हिंग, इलायची, केशर इत्यादी. चला तर घेऊया नेमका हा मामला आहे तरी काय.

बिगबॉसच्या घरातील स्पर्धक असलेल्या हिनाच्या एका चाहत्याने तिला चुगली केली आहे. घरातील एका सदस्य तुला हिंग म्हणतो, जे बेचव असते, असे हा चाहता हिनाला सांगतो. आता हिनाला हिंग हे नाव कुणी दिले तर वीणाने. पण वीणाचे मानाल तर ही नावे तिने ठेवली नसून परागने ठेवली आहे. केवळ हिनालाच नाही तर किशोरी यांना केशर, वीणाला बदाम, रुपालीला इलायची असे नामकरण त्याने केले आहे.

तर दुसरीकडे परागने प्रतिस्पर्धी नेहाच्या कानशीलात लगावली होती ज्यामुळे त्यालाही बिग बॉसने घराबाहेर बाहेर काढले. अर्थात पराग पुन्हा परतला. कारण बिग बॉसने त्याला केवळ निलंबित केले होते, घरातून बडतर्फ नाही. कालच्या वीकेंडच्या डावात महेश मांजरेकरांनी त्याला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. महेश मांजरेकरांनी पराग ज्याप्रकारे नेहाशी वागला त्याचा जाब विचारला आणि त्याला कठोर शब्दांमध्ये खडसावले. सदस्यांनी टास्क दरम्यान झालेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हा एकदा सांगितल्या. परागनेही त्याची बाजू मांडली आणि पराग पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top