Connect with us

मराठी कलाकार

फॅन्सना क्रेझी बनवतायंत प्राजक्ता माळीच्या अदा.पहा फोटोज.

Photos

फॅन्सना क्रेझी बनवतायंत प्राजक्ता माळीच्या अदा.पहा फोटोज.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. जक्ता सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपल्या पर्सनल लाईफ आणि तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात. नुकतंच तिने शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय.

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

प्राजक्ताने तिचा एक थ्रो बॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती स्टनिंग दिसतेय. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.

Comments

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top