Connect with us

मराठी कलाकार

पारधी समाजाचे वास्तव मांडणारा”पारधाड”.आगामी सिनेमा. 

Upcoming Movies

पारधी समाजाचे वास्तव मांडणारा”पारधाड”.आगामी सिनेमा. 

नुकताच पारधी समाजातील लोकांच्या लक्षणीय उपस्थितीत ‘पारधाड’ या सिनेमाचा पोस्टर आणि ट्रेलर लाँच सोहळा पुण्यात पार पडला. फासे पारधी समाजाचे वास्तव आणि दाहकता या सिनेमात चित्रित करण्यात आली आहे.अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजांपासून भटक्या आणि विमुक्त जाती कशा प्रकारे वंचित आहेत, याचं नेमकं चित्रण सिनेमात दाखविण्यात आलं आहे. दिग्दर्शक ज्ञानेश्वर भोसले यांचे ‘चौदा महिने तेरा दिवस’ या आत्मचरित्रावर आधारीत आहे. पारधाड सिनेमाची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, पारधी आयोग भारत सरकारचे भिकूजी तथा दादा इदाते, भारत माता आदिवासी मोहोळ-सोलापूरच्या पारधी विध्यार्थी वसतिगृह व्यवस्थापिका विजया भोसले, स्वामी विवेकांनद आदिवासी छात्रवासच्या मीरा ताई फडणीस आणि पुण्याच्या नगरसेविका राजश्री काळे तसेच सिनेमातील मुख्य कलाकार मंडळी याप्रसंगी पुण्यातील मंगला थिएटरमध्ये उपस्थित होती.

या सिनेमाबाबत दिग्दर्शक ज्ञानेश्वर म्हणतात, ”गुन्हेगार’ ही ओळख वगळता या समाजातील लोकांना कोणत्याही प्रकारचे ओळख प्रमाणपत्र नाही. समाजाकडून, पोलिसांकडून अवहेलना आणि अत्याचार पाचवीला पुजलेला आहे. त्याची झळ आणि सत्यता सिनेमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशातून पारधाड सिनेमाची निर्मिती केली. या सगळ्यात माझी पत्नी आणि बहिणीने केलेला त्याग आणि बलिदान शब्दात मांडू शकत नाही. तो सिनेमात पाहिल्यावरच लक्षात येईल’.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Upcoming Movies

To Top