Connect with us

मराठी कलाकार

विद्युत जमवालसोबत झळकणार ‘हि’मराठी अभिनेत्री.करतेय बॉलिवूडमध्ये एंट्री!

Actress

विद्युत जमवालसोबत झळकणार ‘हि’मराठी अभिनेत्री.करतेय बॉलिवूडमध्ये एंट्री!

मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर ‘ती’ थेट बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ‘ती’ बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून ‘ती’ रसिकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता विद्युत जामवालसोबत ‘ती’ ‘जंगली’ सिनेमात झळकणार आहे. आणि हि ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आपल्या मराठी सिनेइंडस्ट्रीची गुणी अभिनेत्री पूजा सावंत!

View this post on Instagram

Love illuminates from within 💕🦋 #sundaymorning

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यावरील ‘जंगली’ हा सिनेमा आहे. प्रवासामध्ये हत्तींची शिकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या विरोधात संघर्ष करणारा नायक विद्युतनं साकारला आहे.तर पूजादेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर नुकताच पूजाने १० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत तिने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले होते. आता पूजा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्यामुळे भलतीच खूश असून तिने आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Comments

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top