Connect with us

मराठी कलाकार

पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री। मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड

News

पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री। मिळाला दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड

मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा लपाछपी सिनेमा चांगलाच गाजला होता. ह्यातील अभिनयाबद्दल तिची बरीच वाहवा झाली होती. प्रेक्षक आणि समीक्षकांच्या चांगलाच पसंतीस हा सिनेमा पडला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी तिच्या कामगिरीची दखल घेतली होती. आता तिच्या ह्या पुरस्कारांच्या यादीत मानाचा तुरा रोवल्या जाणार आहे. पूजाला यंदा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात येणार आहे.

Pooja Sawant

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके ह्यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंतला ह्या पुरस्काराने गौरवण्यात येईल. लपाछपी आणि पूजा सावंत ह्यांची दखल केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून घेतली जात आहे. सौंदर्य आणि नैसर्गिक अभिनयाच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीत पूजाने स्वतःच अनोखं स्थान निर्माण केलं आहे. पूजाच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचं सध्या बघायला मिळतंय.

पूजाने २०१० साली आलेल्या मल्टीस्टारर क्षणभर विश्रांती मधून सिनेमांत पदार्पण केलं होतं. महाराष्ट्रीयन असलेली पूजा मुळची मुंबईत जन्मलेली आहे. पुढे मग तिने झक्कास, पोष्टर बॉईज, सतरंगी रे, दगडी चाळ अशा बऱ्याच गाजलेल्या सिनेमांत अभिनय केला आहे. याव्यतिरिक्त पूजा बऱ्याच रिऍलिटी शोज आणि डान्स शोज मध्ये सुद्धा आपल्याला दिसली आहे. एकापेक्षा एक, बुगीवुगि ह्या कार्यक्रमांतून ती आपल्याला छोट्या पडद्यावर झळकताना दिसलेली आहे. पूजाच्या ह्या दमदार कामगिरीबद्दल आणि तिच्या भावी वाटचालीसाठी आमच्या मराठी कलाकार टीमकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा!

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top