Connect with us

छत्रपती शिवाजी महाराजांवरचा ऍनिमेशनपट लवकरच येतोय आपल्या भेटीला

Movie Trailers

छत्रपती शिवाजी महाराजांवरचा ऍनिमेशनपट लवकरच येतोय आपल्या भेटीला

छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हटलं कि डोळ्यांसमोर येतं तो गर्वाने छाती फुलवणारा इतिहास आणि एक दैदिप्यमान चरित्र. हेच राजे छत्रपती आता आपल्या समोर ऍनिमेशन स्वरूपात प्रथमच येणार आहेत. गणराज फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली असून निलेश मुळे हे दिगदर्शकाची जबाबदारी सांभाळत आहेत. या आधी सुद्धा महाराजांची गाथा आपल्या समोर अनेक मालिका किंवा इतर सिरीज स्वरूपात आपल्या समोर आलेली आहेच आणि रितेश देशमुख सुद्धा ह्या विषयावरती चित्रपट बनवत असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण, आता प्रथमच आपल्याला महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ह्या ऍनिमेशन स्वरूपात दिसतील. ‘प्रभो शिवाजी राजा’ असं या ऍनिमेशनपटाच नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर याआधी गाजलेली ‘राजा शिवछत्रपती’ हि मालिका आपण बघितलेलीच आहे ज्यामध्ये डॉ. अमोल कोल्हेनी महाराजांची भूमिका अगदी जीव ओतून रंगवली होती. अगदी तसंच, या ऍनिमेशन पटालासुद्धा आपल्या मराठी नायकांचे खरेखुरे आवाज वापरले जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला उमेश कामतचा आवाज वापरण्यात आला आहे तर सूत्रसंचलनासाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला आहे. ऐतिहासिक सिनेमांच्या बाबतीत सध्या असलेलं वातावरण बघता संम्पूर्ण अभ्यास करूनच या सिनेमाची निर्मिती केली असल्याचं दिगदर्शक म्हणतात. हा ऍनिमेशनपट तयार करण्यासाठी तब्बल २ लाख ५० हजारांच्या वरती चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. महाराजांच्या चरित्राला अगदी प्रमाण मानून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. सध्या कार्टून्स पाहण्यात मग्न असलेल्या बाल पिढीला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता ऍनिमेशन स्वरूपात या चित्रपटाद्वारे पोचवल्या जाईल. येत्या काही दिवसांत हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा उद्देश सार्थकी लागेल हे मात्र नक्की!

Comments

comments

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top