Connect with us

मराठी कलाकार

पतीसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय प्रार्थना.पहा गोड कपल्सचे रोमँटिक फोटोज.

Photos

पतीसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय प्रार्थना.पहा गोड कपल्सचे रोमँटिक फोटोज.

मितवा फेम अभिनेत्री प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. सध्या हे कपल थायलंडमध्ये ऍनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असून सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये हे कपल बोटीतून समुद्रसौंदर्य डोळ्यात साठवत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुझ्या कवेत असलं की सुरक्षित घरी असल्यासारखं वाटतं असं तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे. पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू प्रार्थना या फोटोमधून सांगण्याचा प्रयत्न करतांना दिसते आहे.

प्रार्थनाचा पती अभिषेक लवकरच मराठी सिनेमात अभिनेता म्हणून झळकणार आहे. पतीच्या पहिल्यावहिल्या सिनेमाची आणि अभिनयातील नवी इनिंगची माहिती प्रार्थनानेच दिली आहे. ‘ग्रे’ या आगामी मराठी सिनेमातून अभिषेक रसिकांच्या भेटीला येणार असून वैभव तत्त्ववादीचा फोटो असलेले सिनेमाचे पोस्टर प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. २०१९ साली हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल. या सिनेमात अभिषेक जावकरसह अभिनेता वैभव तत्त्ववादी, पल्लवी पाटील आणि मयुरी देशमुख यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

प्रार्थना बेहरेने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स ऐप लग्न अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थनाची चांगलीच जुळलेली केमिस्ट्री आपल्याला या सिनेमांमधून बघायला मिळाली आहे.

Comments
Continue Reading
Advertisement

More in Photos

To Top