Connect with us

मराठी कलाकार

वय वर्ष ४५। आजही अगदी चिरतरुण। बर्थडे स्पेशल। अभिनेता प्रसाद ओक

Actor

वय वर्ष ४५। आजही अगदी चिरतरुण। बर्थडे स्पेशल। अभिनेता प्रसाद ओक

कधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर कधी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद ओक. आज प्रसाद ४५ वा वाढदिवस साजरा करतोय. प्रसादचा जन्म १७ फेब्रुवारी १९७२ सालचा. आजवर प्रसाद आपल्याला अभिनेता, दिगदर्शक, गायक, कवी अशा अनेक रूपांत दिसला आहे. प्रसादचा जन्म पुण्यातला. त्याच शिक्षण भावे हायस्कुल,पुणे इथून झालं आणि पुढे ग्रॅज्युएशन बीएमसीसी कॉलेजातून झालं. प्रसादला लहानपणापासूनच ऍक्टर बनायचं होत त्यामुळे त्याने आधी छोटे,मोठे रोल करण्यास सुरुवात केली. पण त्याच्या करिअरची खरी सुरुवात ‘प्रेमाची गोष्ट’ ह्या नाटकाचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून झाली. पहिल्याच नाटकाच्या वेळेस त्याला श्रीराम लागू आणि निळू फुले ह्या महान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

Prasad Oak

वेगवेगळ्या भूमिका, आणि अभिनय कौशल्य घेऊन प्रसाद आजवर सगळ्यांसमोर आला. आणि प्रेक्षकांना तो आवडला सुद्धा. प्रसादच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर त्याचा प्रेमविवाह झालेला आहे. आणि आज त्याला सार्थक आणि मयांक हि दोन मुलंही आहेत. आजपर्यंत प्रसादने ८०हुन अधिक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यापैकी ‘अवघाचि हा संसार’, ‘असंभव’, ‘घरकूल’, ‘वादळवाट’, ‘दामिनी’ ह्या काही गाजलेल्या मालिका. सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ‘रोशन विला’, ‘बाळकडू’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘जेता’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘फुल ३ धमाल’, ‘क्षण’ आणि अजूनही बऱ्याच सिनेमांमध्ये वाखाणण्याजोगा अभिनय केला आहे. आजही प्रसादकडे पाहून वाटत नाही कि त्याच वय ४०,४५ असावं. व्यायाम आणि योग्य आहार हेच आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं प्रसाद म्हणतो.

अशा ह्या चिरतरुण अभिनेत्याला आमच्या मराठी कलाकार टिमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actor

To Top