Connect with us

मराठी कलाकार

प्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार – पहा Photos

News

प्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार – पहा Photos

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लग्नगाठीत अडकण्यास सज्ज झाली आहे. तिने नुकताच इंस्टाग्राम वर फोटो अपलोड करून खालील कॅप्शन दिले आहे.

And the marriage Vidhi begins…#gettingmarriedsoon #8daystogo #excited #notnervous #happyme …missing you @abhishekjawkar

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर १४ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. ती म्हणते कि एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने अभिषेक आणि माझी ओळख झाली. “मी स्वत: एक अभिनेता बनण्याचा कधीही विचार केला नाही, मला लेखिका-दिग्दर्शक व्हायचे होते. मी बर्याच कलाकारांशी कनेक्ट करू शकत नाही, कारण ते फिटनेस आणि मेक-अप याबद्दल बोलतात. वास्तविक कार्यचित्रपट निर्मितीमधेच घडते असा माझा विश्वास आहे. मला दिग्दर्शक आणि लेखकांशी संवाद करणे आवडते.

अभिषेक आणि माझ्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्याने तो चांगला जोडीदार ठरू शकतो असं मला वाटलं. त्यामुळे त्याला पसंत केलं.’ हा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार असून, डेस्टिनेशन वेडींग करण्याचे प्रार्थनाने ठरवले आहे.

प्रार्थनाच्या लग्नाचे स्थळ ठरले असून ती गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका सुंदर हॉटेलमध्ये सुर्यास्ताच्या वेळी प्रार्थना व तिचा होणारा नवरा अभिषेक लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रार्थनाच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रार्थनाच्या मराठी इंड्स्ट्रीतील अनेक मित्रमैत्रिणी लग्नाच्या एक दिवस आधी गोव्याला रवाना होणार आहेत.

पार्थना आणि अभिषेक यांचे अभिनंदन.

Comments

More in News

To Top