Connect with us

मराठी कलाकार

“ह्या”अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदांचे फोटोज.’प्रेमवारी’ सिनेमातील आयटम साँग.

Actress

“ह्या”अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदांचे फोटोज.’प्रेमवारी’ सिनेमातील आयटम साँग.

लव्ह स्टोरी असणाऱ्या ‘प्रेमवारी’ चित्रपटातील ‘तू ऑनलाईन ये ना’ हे आयटम साँग नुकतेच प्रदर्शित झाले. प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या मीरा जोशी हिच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले असून या गाण्यात तिची एन्ट्री जेसीबी मधून होताना दिसतेय. या गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांचे असून, अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर वैशाली सावंत यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.

दोन रात्रींमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या जल्लोषमय गाण्याचे चित्रीकरण कोपरगावनजीक वारी या गावात झाले. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून,प्रस्तुतीही त्यांचीच आहे. प्रेमाचे महत्व अधोरेखित करणारा हा चित्रपट ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार असून प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेम म्हणजे त्याग, समर्पण. प्रेमाचे एक अनोखे रूप या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

To Top