Connect with us

मराठी कलाकार

प्रियाच्या “त्या”लेस्बियन सीनने एकच खळबळ!पहा व्हीडिओ.

Actress

प्रियाच्या “त्या”लेस्बियन सीनने एकच खळबळ!पहा व्हीडिओ.

प्रिया बापट या नावाला वेगळी ओळख द्यायची काही गरज नाही. प्रत्येक मराठी मनासाठी हे नाव ओळखीचं आहे. पण आता अमराठी लोकांमध्येही या नावाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘हॉटस्टार’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’मुळे सध्या प्रत्येकाच्या तोंडी प्रियाचंच नाव आहे. आता तुम्ही विचार करत असाल की नेमकी या वेबसीरिजमध्ये असं काय आहे की प्रिया बापटचीच चर्चा होत आहे.

आजवर अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या प्रियाने आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही तिची पहिलीवहिली वेब सीरिज ‘हॉटस्टार’ या ऍपवरून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे आणि चर्चा होण्यामागचं कारणही तसंच आहे. या सीरिजमधील प्रिया बापटचा एक बोल्ड सीन व्हायरल होत आहे. प्रिया बापट हिची आतापर्यंतची इमेज ही सोज्वळ किंवा गर्ल नेक्स्ट डोअर अशी आहे. मात्र, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही जी दृश्य दाखवण्यासाठी भल्याभल्या अभिनेत्री तयार होत नाहीत, ते लेस्बियन दृश्य प्रियाने तिच्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजमध्ये दिलं आहे. या दृश्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच कल्ला निर्माण झाला आहे. प्रियाचा बोल्ड अंदाज काहींना आवडला असून काही प्रेक्षकांनी प्रियाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी असून प्रिया या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. प्रियाने साकारलेल्या या बोल्ड भूमिकेबद्ल ती म्हणाली, ‘बोल्ड सीनबाबत मला वाटतं की, ते तुमच्या कथेचा भाग आहेत का? तुम्ही कोणती भूमिका साकारता आहात? दिग्दर्शक कोण? लेखक कोण? ते दृश्य कथेची गरज म्हणून करता आहात की फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे? तुमच्या त्या दृश्यांनी कथेत खरंच मोठा फरक पडणार आहे का? या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात.’

Comments

More in Actress

To Top