Connect with us

मराठी कलाकार

१८वर्षांची झालीये पुष्कर श्रोत्रीची मुलगी.पहा बर्थडे फोटोज.

Photos

१८वर्षांची झालीये पुष्कर श्रोत्रीची मुलगी.पहा बर्थडे फोटोज.

आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे अभिनेता पुष्कर शोत्री रसिकांचा लाडका बनला आहे. नुकतीच पुष्करची मुलगी शनाया १८ वर्षांची झाली असून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाचा फोटो पुष्करने नाही तर अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत पुष्करची मुलगी शनाया व पत्नी प्रांजल आणि प्रसाद ओक व त्याची पत्नी मंजिरी दिसते आहे. हा फोटो शेअर करत प्रसादने विनोदी ढंगात ‘पुष्कर श्रोत्रीची मुलगी मोठी झाली…. १८ वर्षाची… पण पुष्कर मात्र अजून… असो’ असे कॅप्शन लिहिले आहे.

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे.

पुष्करने निर्मिती आणि दिग्दर्शित केलेल्या ‘उबुंटू’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कलाकार आपल्याला सिनेमे, नाटकं, मालिका करताना दिसतात. त्यांची अफाट लोकप्रियता पाहून सर्वसामान्य फॅन्स बरंय बाबा असा सूरही काढत असतात. कलाकारांच्या या आयुष्याचा हेवाही वाटतो काहींना. पण अनेकदा त्यामागे अपार कष्ट असतात. अभिनेता पुष्कर श्रोत्रीनं असे बरेच अनुभव याआधी मीडियाशी बोलताना शेअर केले आहेत.

Comments

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top