Connect with us

मराठी कलाकार

राधिका आपटे-नवाजुद्दिन”ह्या”सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र.

Featured

राधिका आपटे-नवाजुद्दिन”ह्या”सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र.

नेटफ्लिक्स वरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’नंतर नवाजुद्दिन सिद्दीकी आणि राधिका आपटे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र येताहेत. नवाज आणि राधिका ‘रात अकेली है’ या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार असून त्यांच्यासोबत अभिनेत्री श्वेता त्रिपाठीदेखील झळकणार आहे. श्वेताने यापूर्वी ‘हरामखोर’ या चित्रपटात नवाजसोबत काम केलं आहे. कानपूरच्या धरतीवर आधारित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असलेला ‘मांझी- द माऊंटन मॅन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटामध्ये नवाजने दशरथ मांझीची भूमिका वठविली होती. त्याच्या या भूमिकेमुळे प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याच्या व्यतिरिक्त अभिनेत्री राधिका आपटेही या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकली होती. राधिकाने या चित्रपटामध्ये दशरथ ‘मांझी’च्या बायकोची भूमिका साकारली होती. त्यामुळे या दोघांची उत्तम केमिस्ट्री या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली. या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे.

राधिका हनी त्रेहानची खूप चांगली मैत्रिण आहे. आधी कास्टिंग डिरेक्टर आणि आता दिग्दर्शक बनणाऱ्या हनीनं नवाज आणि राधिका यांची आपल्या सिनेमासाठी खास निवड केल्याचं कळतंय. चित्रपटामध्ये नवाज एका इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे. तर राधिका आणि श्वेता उच्चभ्रु कुटुंबातील मुलींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लखनौ आणि ग्वाल्हेर येथे सुरु असून येत्या २५ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Featured

To Top