Connect with us

मराठी कलाकार

९० वर्षांच्या “ह्या” जेष्ठ अभिनेत्याची “छत्रीवाली” मालिकेत एंट्री!जाणून घ्या अधिक.

Television

९० वर्षांच्या “ह्या” जेष्ठ अभिनेत्याची “छत्रीवाली” मालिकेत एंट्री!जाणून घ्या अधिक.

बऱ्याच कालावधीनंतर मराठी सिनेमातील दिग्गज अभिनेते रमेश देव यांची छोट्या पडद्यावर झलक आपल्याला स्टार प्रवाह वरील “छत्रीवाली” मालिकेत बघायला मिळत आहे. सदर मालिकेत सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे. सदानंद कुलकर्णी पुण्यात त्यांची नात नीलम हिच्यासोबत रहातात. गायकवाड कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अरुंधती म्हणजे विक्रमच्या आईला ते मुलीप्रमाणे मानायचे. अरुंधतीचा नवरा म्हणून सूर्यकांत यांची सदानंदरावाशी ओळख झाली. सूर्यकांतसाठी सदानंद म्हणजे आदर्श ठरले आणि ते त्यांना बिझनेस गुरु मानु लागले. आजारपणात विक्रमची आई म्हणजेच अरुंधतीने जगाचा निरोप घेतला. सदानंद यांची नात नीलम हिचं विक्रमशी लग्न व्हावं ही तिची अंतिम इच्छा होती. अरुंधतीची हीच इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने सदानंद यांची मालिकेत एंट्री झाली आहे.

मालिकेतील मधुरा विक्रमची लव्हस्टोरी निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एंट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार? याची उत्कंठावर्धक कहाणी प्रेक्षकांना ‘छत्रीवाली’च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top