Connect with us

मराठी कलाकार

…आणि रणवीरने दिलं अमृताला ‘असं’ सरप्राईझ!

Actor

…आणि रणवीरने दिलं अमृताला ‘असं’ सरप्राईझ!

बॉलिवूडचा हॉट अभिनेता रणवीर सिंगच्या रापचिक अंदाजामुळे सर्वत्र त्याची फॅनफॉलोविंग बघायला मिळते. अनेक तरुणी त्याच्या अदांनी घायाळ होतात. केवळ सर्वसामान्यचं नाही तर सेलेब्स सुद्धा रणवीर सिंगचे चाहते होण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांपैकीच एक नाव म्हणजे मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर! अमृता रणवीरची खुप मोठी चाहती आहे, हे जगजाहीर आहे. रणवीरदेखील आपल्या या चाहतीला दरवेळी काही न काही सरप्राईज देताना आपल्याला दिसून येतो. मात्र, त्याने यावेळी अमृताला दिलेलं सरप्राईज जरा हटके आहे.

शूटिंग शेड्युल बिझी असल्यामुळे दोघांना प्रत्यक्षात भेटणं शक्य नव्हतं, पण रणवीरने वेळात वेळ काढत अमृताच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिची भेट घेतली. रणवीरचे हे सरप्राईज व्हिजिट अमृतासाठी आनंदाचा मोठा धक्काच ठरला. त्याचे झाले असे की, जोगेश्वरी येथील फिल्मिस्तान स्टुडियोमध्ये ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे शूटिंग चालू होते. त्याच जवळपास सुरु असलेल्या एका हिंदी कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये रणवीर सिंग आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यादरम्यान अमृतादेखील इथेच असल्याचं त्याच्या लक्षात आले.त्यामुळे अमृताला प्रत्यक्षात भेटण्याची ही नामी संधी त्याने हेरली आणि तो थेट ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ शोच्या सेटवर जाऊन धडकला. रणवीरच्या येण्यानं केवळ अमृतालाच नव्हे तर सेटवरील बच्चेकंपनीला देखील मोठा आनंद झाला.

अचानकपणे, कसलीही पूर्व कल्पना न देता रणवीर सिंह थेट समोर उपस्थित राहणे यासारखे सुंदर सरप्राईज अमृतासाठी कोणतेही नसेल. अमृताशी गप्पा-गोष्टी रंगल्या नंतर, आपल्या सुपर स्पर्धकांच्या उत्साहाला दाद देत रणवीरने त्यांच्यासोबत सेल्फी-फोटो काढले. अशाप्रकारे काही मिनिटांचे हे सरप्राईज एक कायमस्वरुपी आठवण रणवीरने भेट म्हणून दिली.

Comments

More in Actor

To Top