Connect with us

मराठी कलाकार

आम्ही बेफिकर चित्रपटातील धमाकेदार आयटम साँग.लवकरच येतेय’रसगुल्लाबाई’.

Video Songs

आम्ही बेफिकर चित्रपटातील धमाकेदार आयटम साँग.लवकरच येतेय’रसगुल्लाबाई’.

शीला, मुन्नी, जलेबीबाई अशा आयटम साँग नंतर आता ‘रसगुल्लाबाई’ एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आम्ही बेफिकर या चित्रपटात हे धमाकेदार आयटम साँग पहायला मिळणार आहे. प्रियंका झेमसे या गाण्यावर ठुमके देताना दिसणार आहे. आतापर्यंत तीने अनेक चॅनेल्सवर व्हीडीओ जॉकी म्हणून काम केलं आहे. तसंच अनेक वेब सीरिजमध्येही आपल्याला प्रियांका दिसली आहे. कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.

सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, ‘आम्ही बेफिकर’ हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं असून हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

या आयटम साँग बद्दल प्रियांका म्हणाली, ‘या गाण्याचं शूटिंग माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीत तीन दिवस शूटिंग केलं होतं. जवळपास दहा सेल्सियसपेक्षाही कमी तापमान होतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकतेचा कस लागत होता. मात्र, संपूर्ण टीमनं सहकार्य केल्यामुळे धमाल पद्धतीनं हे गाणं शूट झालं. धमाकेदार शब्द असलेलं हे गाणं प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.’

Comments

More in Video Songs

To Top