Connect with us

मराठी कलाकार

“माझ्या नवऱ्याची बायको”मधल्या दोन्ही शनाया का बरे आल्या एकत्र?वाचा अधिक.

Featured

“माझ्या नवऱ्याची बायको”मधल्या दोन्ही शनाया का बरे आल्या एकत्र?वाचा अधिक.

“माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतून शनाया हे पात्र प्रकाश झोतात आले. पहिले शनायाची भूमिका रसिका सुनील हिने पार पाडली होती. परंतु आता ती भूमिका ईशा केसकर निभावत आहे. या दोन्ही शनाया ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असून या दोन्ही शनाया ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात दिसणार आहेत.

“गर्लफ्रेंड”च्या निमित्ताने अमेय वाघ आणि सई ताम्हणकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर उपेंद्र सिंधये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे लेखन केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

काय आहे “गर्लफ्रेंड”च्या ट्रेलरमध्ये?

ट्रेलरच्या सुरुवातील गर्लफ्रेंड नसल्यामुळे नचिकेत रडत असल्याचे दिसत आहे. आता पर्यंत एकही गर्लफ्रेंड का नाही असा प्रश्न विचारुन नचिकेतची मैत्रीण त्याला विचार करण्यास भाग पाडते. नचिकेतचे मित्र त्याला मैत्रीणी बनवण्याचा सल्ला देतात. त्यानंतर नचिकेतच्या आयुष्यात अलिशा उर्फ सई ताम्हणकर येते. परंतू नचिकेतला अचानक गर्लफ्रेंड कशी मिळते हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळणार आहे.

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top