Connect with us

मराठी कलाकार

शनाया उर्फ रसिका सुनीलने पूर्ण केले “हे”धाडसी प्रशिक्षण.पहा फोटोज.

Actress

शनाया उर्फ रसिका सुनीलने पूर्ण केले “हे”धाडसी प्रशिक्षण.पहा फोटोज.

शनाया या लाडक्या भुमिकेद्वारे घरोघरी पोचलेली अभिनेत्री रसिका सुनील खासगी आयुष्यात एक धाडसी स्त्री आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. सध्या शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचे शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेली आहे. मात्र तिथे ती शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते आहे. नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायवरचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते.

“मला समुद्र खूप आवडतो आणि बऱ्याच कालावधीपासून मला स्कुबा डायविंग करायची इच्छा होती. त्यामुळे प्रॉपर ट्रेनिंग घेतले. मला यावेळी एक गोष्ट जाणवली की स्कुबा डायविंग हे जबाबदारीचे स्पोर्ट्स आहे आणि इथे सुरक्षित राहण्यासाठी खूप सायन्स आणि टेक्निक महत्त्वाचे आहे. या ट्रेनिंगदरम्यान स्कुबा डायविंगचे बारकावे व आपातकालीन समयी बचावकार्य करण्याचे तंत्र समजले.” असे यावेळी रसिकाने सांगितले.

पॅसिफिक महासागरचे पाणी खूप थंड आहे. आम्ही वेट सुट, ग्लोव्हज, बूट्स, स्कुबा गेअर असे सगळ्या गोष्टी परिधान केल्या होत्या. कारण पाण्यात उबदार वाटले पाहिजे. पाण्यातील तापमान ८ डिग्री सेल्सिअस इतके असते. पण समुद्राच्या तळातील सौंदर्य म्हणजेच मासे आणि शंख शिंपले हे दृश्य खूपच अप्रतिम आहे. स्कुबा डायविंग शिकून मी खूप खूश आहे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. हे इतके सोपे नव्हते. असेही सांगताना रसिका विसरली नाही.

Comments

More in Actress

To Top