Connect with us

मराठी कलाकार

रेशम टिपणीस पडली घराबाहेर तर, बिगबॉस मराठी ग्रँडफिनालेच्या दिशेने.

Featured

रेशम टिपणीस पडली घराबाहेर तर, बिगबॉस मराठी ग्रँडफिनालेच्या दिशेने.

बिगबॉस मराठीचा सीझन पहिला आता जवळजवळ संपण्याच्या मार्गात आहे. सुरुवातीस ऐकून 15 सदस्यांनी भरून असलेल्या बिगबॉसच्या घरात आता मोजकी मंडळीच बाकी उरली आहे. त्यांच्यातही आता टास्कस, नॉमिनेशनची चुरस वाढलेली आपल्याला दिसते आहे. बरेच सदस्य ह्या घरात आले आणि गेले सुद्धा आणि ह्यातील मोजकेच सदस्य चाहत्यांवर छाप करण्यात यशस्वी ठरले. रेशम टिपणीस हे त्यापैकीचं एक नाव! दर आठवड्याच्याप्रमाणे ह्या आठ्वड्यातही नॉमिनेशन प्रकिया पार पडली त्यात ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर पडावं लागणार होतं. नॉमिनेट झालेल्यापैकी स्मिता, अस्ताद आणि रेशम कोण घराबाहेर पडणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आणि कमी मतं पडल्यामुळे रेशमला शेवटी घराबाहेर पडावं लागलं.

बिगबॉसच्या प्रवासात रेशमने संपूर्ण फॅन्सवर छाप सोडली होती. घरात जाणारी पहिली स्पर्धक बनून पुढे राजेश सोबतची केमिस्ट्री, आणि मग बऱ्याच भांडणाचा, आव्हानांचा तिने सामना करत 90 दिवस यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. एकीकडे तिच्या चाहत्यांना तीच ह्या सिझनची विनर होणार हे वाटत असतांना रेशमचा बाहेर पडण्याने धक्का बसला आहे.
तिकीट टू फिनाले ह्या टास्कमध्ये जिंकल्याने पुष्करला थेट ग्रँड फिनालेचं तिकीट मिळालं आहे. रेशमला बिगबॉसने घराबाहेर जाता जाता एक अधिकार दिला होता ज्याद्वारे ती कुण्याही एका सदस्याला सेफ करू शकत होती. ह्यावेळी तिने आस्तादला सेफ केलं. त्यामुळे आता पुष्कर आणि आस्ताद ह्या दोघांनी ग्रँडफिनालेमध्ये आपलं स्थान जिंकून ठेवलं आहे. अजून एक नॉमिनेशन बाकी असून आता कोणता सदस्य बाहेर पडतो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top