Connect with us

मराठी कलाकार

“हा”बघा रिंकू राजगुरूचा १२वीचा निकाल!मराठीकलाकार exclusive.

News

“हा”बघा रिंकू राजगुरूचा १२वीचा निकाल!मराठीकलाकार exclusive.

सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. यात रिंकूने दहावीपेक्षा तब्बल १६ टक्के अधिक मिळवत तब्बल ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती. सैराट या चित्रपटातून रिंकूला खरी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून ती आर्ची या नावाने जगप्रसिद्ध झाली. नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने रिंकूला जगभरात ओळख निर्माण करून दिली. सैराट या चित्रपटामुळे प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या आर्चीने म्हणजेच रिंकू राजगुरूने बारावीच्या परिक्षेत चांगले यश संपादित केले आहे.

रिंकूने दहावीला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शाळेतून परीक्षा देत ६६.१० टक्के गन संपादित केले होते. मात्र बारावीला अधिक अभ्यास करून तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. तिने यंदा सोलापूर जवळील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा दिली. तिला बघण्यासाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यंदा तिचा कागर चित्रपट प्रदर्शित झाला असून आगामी चित्रपटाचे काम बेळगाव येथे सुरु असल्याचे समजते.

दहावीच्या वेळी रिंकूच्या सैराट चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने तिला शाळेत जाता आले नव्हते. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याचे रिंकूने त्यावेळी सांगितले होते. मात्र ही कसर रिंकूने बारावीच्या परीक्षेत ६०० पैकी ५३३ गुण मिळवत भरून काढली. राज्य शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत घेण्यात आलेली परीक्षा रिंकूनेही दिली होती. यात तिला चांगले यश मिळाले आहे. रिंकूने आर्टस ही शाखा निवडली होती. या शाखेतून तिला ८२ टक्के मिळाले आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top