Connect with us

मराठी कलाकार

रिंकूच्या ग्लॅमरस अदा लावतील तुम्हाला वेड!पहा फोटोज.

Photos

रिंकूच्या ग्लॅमरस अदा लावतील तुम्हाला वेड!पहा फोटोज.

‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.

तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक रिंकूच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे. काही दिवसांपूर्वी रिंकू ‘मेकअप’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. रिंकूने मेकअपसाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. रिंकू राजगुरूच्या मेकअप या आगामी चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

या टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे. हा टीजर पाहून ग्रामीण भागातील मुलगी शहरात आल्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडते हे पाहायला मिळेल असा अंदाज लावला जात आहे.

Comments

More in Photos

To Top