Connect with us

मराठी कलाकार

रिंकू राजगुरूचे लेटेस्ट फोटोशूट.पहा साडीतील मनमोहक फोटोज.

Photos

रिंकू राजगुरूचे लेटेस्ट फोटोशूट.पहा साडीतील मनमोहक फोटोज.

संबंध महाराष्ट्र जिला प्रेमाने आर्ची नावाने ओळखतो त्या अभिनेत्री रिंकू राजगुरूला सैराट या एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते.

रिंकूने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत तिने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे. साडीला साजेशे असे तिने ट्रेडिशनल दागिने घातले असून चंद्रकोरची टिकली लावली आहे. ती या रूपात खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत रिंकूने केवळ ५४ पोस्ट टाकल्या असून तिच्या इन्स्टाग्रामवर खूपच कमी एक्टिव्ह असते हे यावरून दिसून येत आहे. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

रिंकूचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता चार वर्षांहून देखील अधिक काळ झाला आहे. रिंकूने सोशल मीडियावर आपले अकाऊंट सुरू करावे ही तिच्या चाहत्यांची चार वर्षांपासूनची इच्छा आहे. पण रिंकूने सोशल मीडियापासून दूर राहाणेच पसंत केले होते. मात्र गेल्यावर्षी तिने तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले. तिच्या या अकाऊंटला अल्पावधीतच खूप चांगले फॉलोव्हर्स मिळाले आहेत.

Comments

More in Photos

To Top