Connect with us

मराठी कलाकार

प्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची”! कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.

Featured

प्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची”! कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.

चाहत्यांनी जिला डोक्यावर घेतलं होतं ती आर्ची आता बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा भेटीस येणार आहे. हो हो! अगदी खरं! सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आता आगामी “कागर” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकेल यात शंकाच नाही. रिंकू राजगुरूच्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पहिल्या पोस्टरमध्ये तीचा वेगळा लूक बघायला मिळत आहे.

तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार जुना जाणार तेव्हाच नवा येणार…’कागर’ असं पोस्टरवर लिहीलं आहे. कागरच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर रिंकू चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. रिंगण, यंग्राड यांसारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कागर च्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कागर सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे ज्यामध्ये रिंकू एका हटके लुकमध्ये दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. सुधीर कोलते आणि विकास हांडे हे दोघे या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमातील गाण्यावर डान्स करतानाचा रिंकू राजगुरुचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रिंकूच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाला घेऊन बरीच उत्सुकता होती.‘सैराट’ चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकूने रातोरात अनेकांच्या मनात घर केले होते . तिची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की रिंकूला महाराष्ट्र आर्ची म्हणूनच ओळखू लागला. आता याच आर्चीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार असल्याचे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top