Connect with us

मराठी कलाकार

का दारूच्या नशेत बडबडतेय रिंकू राजगुरू?वाचा रंजक गोष्ट.

Movie Teaser

का दारूच्या नशेत बडबडतेय रिंकू राजगुरू?वाचा रंजक गोष्ट.

सैराटच्या दणदणीत यशानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूचा दुसरा सिनेमा कागर नुकताच प्रदर्शित झाला. कागर सिनेमाला सुद्धा रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर लगेचच रिंकूच्या पुढील सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मेकअप असं ह्या सिनेमाचं नाव असल्याचं कळत असून रिंकू या टीजरमध्ये दारू पिऊन बडबडताना दिसत आहे. कागर या चित्रपटानंतर रिंकूचा पुढचा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. रिंकूच्या त्या चाहत्यांसाठी हि एक आनंदाची बातमीच म्हणावी लागेल.

या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे. हा टीजर पाहून ग्रामीण भागातील मुलगी शहरात आल्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडते हे पाहायला मिळेल असा अंदाज लावला जात आहे. या टीजरमध्ये रिंकूचा गाम्रीण लहेजा ऐकायला मिळत असून हा चित्रपट खूपच रंजक वाटत असल्याची प्रतिक्रिया हा टीजर पाहून तिचे चाहते देत आहेत.

सैराटला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर घराच्या बाहरे पडणे देखील रिंकूला शक्य होत नव्हते. एवढेच काय तर शाळेत जाताना देखील लोक गर्दी करत असल्याने तिने शाळा सोडून प्रायव्हेट शिक्षण घेणे पसंत केले. रिंकूला पहिल्याच चित्रपटात मिळालेली लोकप्रियता अनेकांना अनेक चित्रपटानंतर देखील अनुभवता येत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सैराट मधील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे.

Comments

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Popular Posts

To Top