Connect with us

मराठी कलाकार

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी येतोय रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा. पहा सिनेमातील लूक

Actress

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी येतोय रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा. पहा सिनेमातील लूक

आपल्या सर्वांची आवडती आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्याला तिच्या आगामी सिनेमातून भेटीस येणार आहे. रिंकूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येनार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे. कागरचं पोस्टरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यात कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

पोस्टर मध्ये एका पडद्याआड उभी असलेली रिंकू या पोस्टरमध्ये पाहायला मिळतेय. पोस्टरमध्ये पडदा त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींची गराडा आणि त्यात रिंकूच्या दिसण्यातला साज अन नजरेतील करारीपणा यांचे भाव विलक्षण आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली असून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे. रिंकूचा हा कमबॅक चित्रपट असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्याच अकलूजमध्ये करण्यात आले आहे.

Comments
Continue Reading
Advertisement

More in Actress

To Top