Connect with us

मराठी कलाकार

रितेशचा आगामी मराठी सिनेमा “माऊली”। जेनेलिया देशमुख करतेय निर्मिती

News

रितेशचा आगामी मराठी सिनेमा “माऊली”। जेनेलिया देशमुख करतेय निर्मिती

सध्या म्हणे रितेश देशमुखने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे. आणि हा प्रोजेक्ट दुसरं तिसरं काही नसून त्याचा येणारा आगामी मराठी सिनेमा आहे. हो! हल्ली रितेश माऊली ह्या त्याच्या आगामी मराठी सिनेमात व्यस्त असल्याचं कळतंय. सिनेमाची विशेष बाब म्हणजे त्याची निर्मिती खुद्द पत्नी जेनेलिया देशमुख करत आहे. नुकतंच रितेशने आणि जेनेलिया ह्या दोघांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवरून ह्याविषयी माहिती दिली. संबंधित ट्विट मध्ये धुसर बॅकग्राऊंड मध्ये मराठमोळा हिरो रितेश अँग्री अवतारात दिसत आहे. आणि “माऊली” “तो येतोय” असं कॅप्शन पोस्टला दिलेलं आहे.

सिनेमाची दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत असून सिनेमाची कथा क्षितिज पटवर्धन ह्यांनी लिहिली आहे. सिनेमात मुख्य भुमिकेत रितेश देशमुख आपल्याला दिसणार आहे. रितेशने ह्याआधी मराठी सिनेमांत 2014 मध्ये दमदार पदार्पण केलं होतं. लय भारी सिनेमातून रितेशचा लय भारी अभिनय बघायला मिळाला होता. त्याच धर्तीवर हा आगामी “माऊली” असल्याचं कळतं आहे. ह्याविषयी अधिक बोलतांना जेनेलिया म्हणाली कि आमच्या दोघांचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट असून पुढेही लवकरच अधिक घोषणा आपण करू. ह्यावरून सध्या तरी माऊली ह्या वर्षाखेरीस आपल्याला बघायला मिळेल असं दिसतंय.

Comments

More in News

To Top