Connect with us

मराठी कलाकार

रितेश आणि जेनेलिया ‘या’ गाण्यात पुन्हा एकत्र. पहा व्हीडीओ.

Video Songs

रितेश आणि जेनेलिया ‘या’ गाण्यात पुन्हा एकत्र. पहा व्हीडीओ.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचं ‘लय भारी’मधील आला होळीचा सण लय भारी हे गाणे प्रचंड गाजले होते. त्याचप्रमाणे तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या आगामी चित्रपटातील धुवून टाक असे बोल असणारे नवे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून होळीच्या थीमवरील हे गाणे आणखीनच रंगीत आणि धमाकेदार आहे. चित्रपटाच्या पहिल्या गाण्याला ‘माझी पंढरीची माय’ ला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमारच्या हस्ते कार्तिकी एकादशीला लॉन्च झालेल्या या गाण्याने आजवर तब्बल आठ ते दहा मिलीयन व्ह्यूज मिळवले. भक्तिरसात नाहिल्यानंतर आता महाराष्ट्र रंगणार आहे तो होळीच्या रंगात!

महाराष्ट्राला हवहवसे असणारे एक मोठे सरप्राईज या गाण्यात दडले आहे. ते म्हणजे या गाण्यातून पुन्हा एकदा रितेश व जेनेलिया परत एकत्र झळकणार आहेत. तब्बल दीडशे ते दोनशे डान्सर्स सोबत हे गाणे हिंदीतल्या आघाडीचे कोरिओग्राफर बॉस्को सिजर यांनी कोरियोग्राफ केलेल्या या गाण्याचे भन्नाट शब्द अजय गोगावले यांनी लिहिले आहेत. येत्या १४ डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याने या गाण्याने डिसेंबरमध्येच सगळयांना रंग खेळण्याची इच्छा होणार हे मात्र नक्की आहे.

याविषयी अधिक बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, ‘जिनेलिया सोबत काम करण्याची कोणतीही संधी मी सोडू शकत नाही, खरतर हे गाणे करण्याचा आग्रह मी त्यांना केला होता. त्यांच्या सोबत ४ वर्षानंतर गाणे करण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि ते ही अजय अतुलच्या धमाकेदार चालीवर, आपेक्षा बाळगतो की तुम्हाला ही हे गाणे पाहायला तितकीच मजा येईल जितकी आम्हाला हे गाणे करताना आली.’

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Video Songs

To Top