Connect with us

मराठी कलाकार

ऍक्शनपॅक ‘माऊली’चा टिझर. रितेश देशमुखचा लय भारी नंतर दुसरा मोठा मराठी सिनेमा.

Actor

ऍक्शनपॅक ‘माऊली’चा टिझर. रितेश देशमुखचा लय भारी नंतर दुसरा मोठा मराठी सिनेमा.

दिवाळीच्या धामधुमीत सध्या रितेश देशमुखचा मच अवेटेड ‘माऊली’ सिनेमाचा टिझर लॉन्च झाला आहे. सिनेमाच्या टिझरहून सिनेमा पुरता ऍक्शनपॅक असल्याचं दिसत आहे. ‘वर्दीत हाये तोवर ठीक आहे, वर्दी नसली कि आपल्यासारखा टेरर कोण नाय’ असे भारदस्त डायलॉग्स टिझरमध्ये आपल्याला मराठमोळा ऍक्शनहिरो रितेश देशमुखच्या तोंडून ऐकायला मिळतात. सिनेमाच्या टिझरबाबत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सर्वप्रथम रितेशने नाही तर किंग खान शाहरुखने त्याच्या फेसबुक हँडलवरून शेअर केला.

सिनेमासोबत अनेक तगडी नावं जोडल्या गेलेली आहेत. ‘माऊली’ सिनेमाची निर्मिती जिनिलिया देशमुख करत असून दिग्दर्शनाची धुरा ‘फास्टर फेणे’ फेम आदित्य सरपोतदार यांनी सांभाळली आहे. सिनेमाला अजय-अतुल यांचं म्युझिक लाभलेलं आहे. तसंच टिझरच्या सुरुवातीस आपल्याला जिओ स्टुडिओज हे मोठ्ठ नावं सुद्धा पदार्पण करतांना दिसत आहे. सिनेमात रितेशची भूमिका एका रावडी पोलीस ऑफिसरची असल्याचा अंदाज टिझर पाहून येत आहे. सदर माऊली सिनेमा येत्या १४ डिसेंबर पासून प्रदर्शित होणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actor

To Top