Connect with us

मराठी कलाकार

… तर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवेल -रोहत शेट्टी

Featured

… तर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवेल -रोहत शेट्टी

आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणावं ह्या उद्देशाने चित्रसृष्टीला नवनव्या सिनेमांची मेजवानी देणारा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी! ‘सिंघम’, ‘गोलमाल’,‘चेन्नई एक्स्प्रेस’ सर्व सीरिजचे दिग्दर्शक रोहित शेट्टीचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. रोहित शेट्टीची ओळख म्हणजे पैसा वसूल आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा दिग्दर्शक अशीच म्हणावी लागेल. हल्लीचा बॉलिवूडमधील ट्रेंड बघायचा झाल्यास तो बायोपिक सिनेमांकडे झुकलेला आढळून येतो. यामुळे नुकतंच एका मुलाखतीत रोहितला एखादा बायोपिक साकारायचा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्या उत्तरादाखल रोहित म्हणाला कि “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणायला आवडेल जर मी बायोपिकचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करेन. त्यांच्याबद्दल मी बरंच काही वाचलं आहे”. आता रोहित शेट्टीने जर भविष्यात शिवाजी महाराजांवरील बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आणलाच तर त्यामध्ये महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Featured

To Top