Connect with us

मराठी कलाकार

आता रोहित शेट्टीसुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत!

News

आता रोहित शेट्टीसुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत!

हल्ली बॉलीवुडकरांना मराठी चित्रपटांच चांगलंच वेडं लागलेलं दिसतंय. अमिताभ बच्चन, रितेश देशमुख,प्रियंका चोप्रा आणि आता तर अजय देवगणच नाना पाटेकर सोबत त्याचा ‘आपला माणूस‘ हा अपकमिंग थ्रिलर मराठी चित्रपट घेऊन येतोय. आता यात अजय देवगनला सोबत घेऊन बॉलीवुडमधील सिंघम, सिंघम रिटर्न्स, गोलमाल सारखे अनेक सिनेमे निर्मित केलेला रोहित शेट्टी बरं कसा मागे राहील? आता रोहित शेट्टी सुद्धा अजयच्या पावलावर पाऊल ठेऊन मराठीत चित्रपट करण्याची तयारी करत असल्याचं समजतंय! हो हो ‘स्कुल, कॉलेज आणि लाईफ’ नावाच्या मराठी सिनेमाची तो निर्मिती करणार आहे. विहान सूर्यवंशी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून दिग्दर्शक रुपाने तो या सिनेमाद्वारे पदार्पण करेल.

‘स्कुल कॉलेज आणि लाईफ’ या चित्रपटाची कथा मागील वर्षी रोहितच्या वाचण्यात आली आणि ती त्याला भावून गेल्यानं तो या कथेवर चित्रपट बनवतोय. या चित्रपटाचं कथानक चार युवकांभोवती फिरते. येत्या मार्च-एप्रिल मध्ये या चित्रपटाची शुटिंग चालू होईल असं कळतंय.आणि, या साठी कुठल्याही अनुभवी कलाकारांना न घेता नवीन कलाकारांना रोहित आणि विहान संधी देणार आहेत. ज्यामुळे हे कथानक ताजचं राहील. आणि, यासोबतच आम्ही सगळे या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचं कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर म्हणतात. या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये खुद्द रोहित सुद्धा असणार आहे आणि तो कलाकारांसमवेत वर्कशॉप पण करणार आहे म्हणे!

Comments
Continue Reading
Advertisement

More in News

To Top