Connect with us

मराठी कलाकार

सईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज. 

Photos

सईचं नवं फोटोशूट.पहा एक्सलुजीव्ह फोटोज. 

गेल्या महिन्यात अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल डिटॉक्स घेतला होता, आणि तब्बल एका महिन्यानंतर आता ती सोशल मीडियावर परतली आहे.  मराठी सिनेसृष्टीतल्या या ग्लॅमरस अभिनेत्रीने हटके स्टाईल करत नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ग्लॅमरस अंदाज असलेला सईचे फोटो कुणालाही घायाळ करेल असेच आहेत. या फोटोवर रसिकांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय.
मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सईचे प्रत्येक अंदाज रसिकांना आवडतो त्यामुळे नव्या फोटोशूटमधील अंदाजही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच पाहायला मिळतोय.
आगामी पाँडेचेरी चित्रपटात सई झळकणार आहे. निसर्गरम्य पाँडेचेरीमध्ये या चित्रपटाचं शुटिंग होणार आहे. सचिन कुंडलकर आणु तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. या सिनेमात सईसह नैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत.

Comments

More in Photos

To Top