Connect with us

मराठी कलाकार

“सई बर्थडे ट्रक”करतोय खाऊ आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप.वाचा अधिक.

News

“सई बर्थडे ट्रक”करतोय खाऊ आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप.वाचा अधिक.

अभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. हे तिच्या सामाजिक जीवनातल्या वावरावरून नेहमीच दिसून आलंय. सईचा समाजकार्यांमध्ये सक्रिय सहभाग असतो आणि तिचा सईहोलिक्स हा फॅनक्लबही सईचे हेच विचार पूढे घेऊन जात आहे. सई ताम्हणकरच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सईहोलिक्स काही ना काही सामाजिक उपक्रम हाती घेतात. गेल्या तीन वर्षात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून सईचा बर्थडे साजरा केला होता.

यंदा त्यांनी पुण्यातल्या सूमारे 100 गरजू मुलांना वह्या-पुस्तके, पेन्सिल अशा शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप केले. सईच्या वाढदिवसानिमित्त पूण्यात फिरत असलेल्या ‘सई बर्थडे ट्रक’ने गरीब मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला. तर दुसरीकडे ‘मिडीयम स्पायसी’ या सईच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर सई वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सईचे कोस्टार ललित प्रभाकर, पर्ण पेठे,निर्माती अशी संपूर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती.

“माझ्या टीमला सई बर्थडे ट्रकची कल्पना सुचली. हे माझे भाग्य आहे की, मला असा फॅनक्लब आणि अशी टीम मिळाली आहे. माझ्या विचारांचा आदर करून ते विचार अंगिकारणारा फॅनक्लब असणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि मीही माझ्या चाहत्यांना आपल्या कामातून प्रेरणा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहीन.” – सई ताम्हणकर, अभिनेत्री

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top