Connect with us

मराठी कलाकार

सई ताम्हणकर करणार स्टॅन्डअप कॉमेडी!

Actress

सई ताम्हणकर करणार स्टॅन्डअप कॉमेडी!

करिअरच्या सुरुवातीस अनेक नवे कलाकर स्टँड-अप कॉमेडी क्षेत्राकडे वळतात. आणि ह्या क्षेत्रात नाव कमावल्यावर मग ते अभिनय़ क्षेत्राकडे जातात. पण अभिनय क्षेत्रात चांगलं नाव, फेम मिळवल्यानंतर एखादा स्टार स्टँड-अप कॉमेडी क्षेत्राकडे जाणार असला तर? पण नाविन्याची ओढ असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या काहीतरी नवं करायचा विचार करतेय. सईने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर नुकताच एक व्हिडिओ अपलोड करत ह्या आपल्या नव्या स्टँडअप कॉमेडीच्या प्रयोगाची माहिती आपल्या चाहत्यांना दिलीय.

सई ताम्हणकर नेहमी नव-नवे ट्रेंड्स घेऊन येत असते. बाकी स्टार्स जे करत नाही, ते काहीतरी वेगळं करण्याचा विचार सई करते. मालिका-चित्रपटाचे क्षेत्र पदाक्रांत केल्यावर सईने एक कुस्ती टिम खरेदी केली. त्यानंतर ती लवकरच एका वैबसीरिजमधूनही दिसणार आहे. आता नवी वाट शोधायची हॅट्रिक मारत सई तिसरी नवी गोष्ट करतेय स्टॅंड-अप कॉमेडीच्या स्वरूपातून करते आहे. सई ताम्हणकर ह्याविषयी म्हणते, “मला स्टॅंडअप कॉमेडियन्सबद्दल आणि ह्या क्षेत्राबद्दल खूप आदर आहे. मी माझ्या करीयरमध्ये काही कॉमेडी सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. पण स्टॅंडअप कॉमेडी खूप वेगळी असते. आणि रंगमंचावर लाइव अभिनय करण्याची नशा काही औरच असते. म्हणून हा नवा अनुभव घेऊन पाहायचाय.”

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

To Top