Connect with us

मराठी कलाकार

आणि सोशल मीडियावरून नाहीशी झालेली सई परतली वापस!

Actress

आणि सोशल मीडियावरून नाहीशी झालेली सई परतली वापस!

मराठीतील सर्वांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकरने गेल्या एका महिन्यात सोशल मीडियावरून डिजीटल डिटॉक्स घेतला होता. तब्बल एक महिना सई सोशल मीडियावर आली नसल्याने चाहत्यांना ती परत येणार कि नाही याची काळजी लागली होती. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली आणि सोशल मीडियवरही परतली आहे. सोशल मीडियवर परतताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केलं आहे.

सईच्या या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या पोस्टनंतर सईचे बॉस बेब लुकमधले फोटोमिडीयावर झळकू लागले आहेत. सई म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी मुंबईत परतलेय. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा मला शुटिंगला खूप फायदा झाला. पण सोशल मीडियामूळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी चाहत्यांना खूप मिस केले. या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरूनही शेअर करेनच.”

 

यासोबतच “फोटोशूट करणं, किंवा शुटिंग करणं हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आता डिजीटल डिटॉक्सनंतर मी पून्हा नव्या जोमाने परतलीय. परतताना, लक्षात येतंय, की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असला, आणि ते आमच्या सारख्या अभिनेत्यांसाठी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट करायचं एक वरदान असलं. तरीही कधीतरी यातून ब्रेक घेऊन आयुष्यातले नव्या अनुभवांना सामोरे जाणे गरजेचे आहे.”असंही सईने सांगितले. सोशल मीडियावर परतल्यावर चाहत्यांना खूप मीस केलं असंही सईने म्हटलं आहे.

 

Comments

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top