Connect with us

मराठी कलाकार

सईने घेतला सोशल मीडियापासून संन्यास!वाचा अधिक.

Actress

सईने घेतला सोशल मीडियापासून संन्यास!वाचा अधिक.

स्टाइलिश लूक्स, परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म, स्टँडअप कॉमेडी यांसाख्या अनेक कारणानं सई २०१८ मध्ये सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत होती. बाकी स्टार्स जे करत नाही, ते काहीतरी वेगळं करण्याचा विचार सई ताम्हणकर नेहमी करते. आता सई ताम्हणकरने सध्या सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. काय म्हणता, बसला ना धक्का? पण हि बातमी अगदी खरी आहे.

सई ताम्हणकरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इन्स्टाग्रामवर सा़डेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत. अशा वेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स सर्वाधिक कसे वाढतील या प्रयत्नात असतात पण सईनं यासर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जेव्हा केव्हा सई सोशल मीडियावर परतेल तेव्हा हटके सरप्राइजेस घेऊन येणार का? याची चाहते वाट पाहत आहेत.

“ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी काहीवेळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेतेय. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत म्हणून मी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.” असं याविषयी बोलताना सई म्हणाली.

Comments

More in Actress

To Top