Connect with us

मराठी कलाकार

काय आहे सईचा आगामी प्रोजेक्ट “मिडीयम Spicy”?वाचा अधिक.

Upcoming Movies

काय आहे सईचा आगामी प्रोजेक्ट “मिडीयम Spicy”?वाचा अधिक.

पॉण्डेचेरी सिनेमाचं शूटिंग संपवल्यानंतर सई ताम्हणकर तिच्या आगामी प्रोजेक्टला लागलीय सुद्धा! इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सईने आपल्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. सईने नुकताच चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला सईने मीडियम Spicy”. सईने शेअर केलेल्या या फोटोत ललित प्रभाकर,पर्ण पेठे,मोहित टाकळकर दिसत आहेत. दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट! असे कॅप्शन सुद्धा तीने दिले आहे.

‘मीडियम Spicy’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सने यापूर्वी वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सई पाँडेचेरी या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. हा संपूर्ण चित्रपट पाँडेचरीमध्ये शूट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचे संपूर्ण शूटींग आयफोनवर शूट केला गेला आहे.

केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर सई बॉलिवूडमध्येही आपलं नाव कमावत आहे. सई सोशलमिडीयावर खूप अॅक्टीव्ह असते. तीच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. सईने दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ‘बोल्ड की सोज्वळ’ अशी पोस्ट शेअर केली होती. तीच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये सई नवीन काय करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली.

Comments

More in Upcoming Movies

To Top