Connect with us

मराठी कलाकार

‘डेट विथ सई’.थरारक वेबसिरीज साकारतेय सई ताम्हणकर.पहा पोस्टर

Actress

‘डेट विथ सई’.थरारक वेबसिरीज साकारतेय सई ताम्हणकर.पहा पोस्टर

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. सैफ अली खान, आर माधवन, भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा बॉलीवूड टॉप सेलेब्सनी वेबसीरिजमध्ये काम केल्यावर आता मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘डेट विथ सई’ ह्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही नवीन सीरिज ZEE5 लवकरच येणार असून त्याचा पहिला पोस्टर सईने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ह्या वेबसीरिजशी निगडीत सूत्रांच्या अनुसार, ही एक थरार मालिका असणार आहे. ह्यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल.

‘डेट विथ सई’ या नावावरूनच वेब सीरिजची संकल्पना थोडीफार तुमच्या लक्षात आलीच असेल. सूत्रांच्या अनुसार, ह्या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. सई ताम्हणकर म्हणली, “डेट विथ सई सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामूळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणाऱ्या ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे. प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल अशी अपेक्षा करते.” येत्या ५ डिसेंबरपासून ZEE5 वर ही सीरिज प्रसारित होणार आहे.

Comments

More in Actress

To Top