Connect with us

मराठी कलाकार

आर्ची येतेय पुन्हा भेटीला! आगामी सिनेमातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल.

Videos

आर्ची येतेय पुन्हा भेटीला! आगामी सिनेमातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल.

पदार्पणातचं ब्लॉकबस्टर हिट सिनेमा सैराटमधून आपल्या भेटीस आलेली आणि सर्वांना जवळची झालेली आर्ची पुन्हा एकदा तिच्या आगामी सिनेमाद्वारे आपल्याला भेटायला सज्ज झाली आहे. सैराट मधील दमदार आणि रावडी भूमिकेमुळे सर्वांच्या मनात आर्चीने अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूने जागा मिळवली. त्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनी ती आपल्याला मोठ्या पडद्यावर झळकतांना दिसणार आहे. कागर हे तिच्या आगामी सिनेमाचं नाव असून सध्या हयातीलच एका गाण्यावर नाचतानाचा रिंकूचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या रिंकूच्या व्हीडिओला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. सदर व्हीडिओमध्ये रिंकूच्या डान्ससोबत तिच्या अदाही पाहायला मिळत आहेत.

आगामी कागर सिनेमा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने ह्यांनी दिगदर्शित केला आहे. निर्मितीची जबाबदारी विकास हांडे आणि सुधीर कोलते यांनी पार पाडली असून सिनेमातील नायक कोण असणार हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. सैराटच्या यशानंतर रिंकूला अनेक सिनेमाच्या ऑफर आल्या होत्या पण शिक्षण चालू असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण आता आगामी कागरच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Videos

To Top