Connect with us

मराठी कलाकार

आर्ची आणि परश्याच्या मुलाची कथा “सैराट२” मध्ये? वाचा अधिक बातमी.

News

आर्ची आणि परश्याच्या मुलाची कथा “सैराट२” मध्ये? वाचा अधिक बातमी.

अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा पहिलाच चित्रपट “सैराट” सुपरडुपर हिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने तगडी कमाई करत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच सैराट २ प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. एबीपी माझा या वाहिनीच्या वृत्तानुसार या सिनेमाचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे. या सिनेमाचे चित्रीकरण पुण्यात सुरू असून पुण्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सैराट २ या नावाची नोंदणी झाल्याचे वृत्त त्यांनी दिले आहे.

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता “सैराट २”मध्ये आर्ची आणि परशाचा मुलगा मोठा झाला असल्याचे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आर्ची आणि परशा हैद्राबादला पळून आल्यानंतर सुमन अक्काने त्यांच्या पाठिशी उभे राहात त्यांना हरपरीने मदत केली होती. हीच अक्का म्हणजेच छाया कदम त्यांच्या मुलाचे संगोपन करणार आहे. पण त्यानंतर त्याचा ताबा अक्का त्याच्या मावशीकडे देणार आहे. या सिनेमात या मावशीची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार असल्याची चर्चा आहे.

Comments

More in News

To Top