Connect with us

मराठी कलाकार

गायक,संगीतकार ते लेखक आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी.

News

गायक,संगीतकार ते लेखक आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी.

गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारे सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीजर संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारी २८ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. या टीजरमध्ये ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं ह, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं ह’ हे लग्नाचे बोल आपणाला ऐकायला मिळतात. या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे,संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत.

सलील कुलकर्णी रंगमंचावरून गायला लागले आणि “चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही” म्हणत त्यांनी आपली मनं जिंकली. संगीतकार म्हणून पस्तीस पेक्षा आधिक चित्रपटाची गाणी केली. परीक्षक म्हणून सारेगम किंवा गौरव महाराष्ट्राचा मधून अनेक नवीन गायकांना घडवताना आपण त्यांच्या चपखल कमेंट्स ऐकल्या. आता ‘वेडिंगचा शिनेमा’या आगामी चित्रपटाची कथा, पटकथा,संवाद, संगीत आणि दिग्दर्शन ह्या सर्व धुरा सलील कुलकर्णी यांनी सांभाळल्या असून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा प्रसन्न अनुभव असणार आहे.

“वेडिंगचा शिनेमा” हा चित्रपट एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असून अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म, आम्ही दोघी आणि मुंबई पुणे मुंबई-३ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

To Top